महत्त्वाच्या बातम्या

सायगाव ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख तर उपाध्यक्षपदी दिलीप वारागडे यांची बिनविरोध निवड 

   सायगाव  ता जावळी येथील ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब देशमुख यांची तर व्हाईसचेअरमनपदी दिलीप वारागडे यांची बिनविरोध निवड  निवडणुक निर्णय अधिकारी रूपणवर व बापूसाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जावळी तालुक्यातील एक आदर्श सोसायटी म्हणून या सायगाव ग्रुप विकास सेवा सोसायटीकडे पाहिले जाते, ठरल्या प्रमाणे मावळते चेअरमन सुनील कदम व व्हाईस चेअरमन उमेश ढवळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सायगाव विभागाचे युवा नेते प्रवीण (नाना) देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या, या वेळी देशमाने बोलताना म्हणाले सायगांव ग्रुप विकास सेवा सोसायटीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही . पुढील काळामध्ये सभासदांना डिविडंड वाटणे ,शासकीय सर्व योजनांचे सभासदांना लाभ मिळवून देणार व  सोसायटीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे साठी दहा लाखाची तरतूदही  केली असल्याचे त्यांनी सांगितले .ही निवडणूक प्रक्रिया  पूर्ण करण्यासाठी रूपनवर साहेब व बापूसाहेब ढवळे उपस्थित होते .
     या निवडी वेळी  माजी चेअरमन सुनील कदम व माजी व्हाईस चेअरमन उमेश ढवळे यांच्यासह, स्वप्नील डोंबे, रामचंद्र जाधव,अतुल भोसले, शिवाजी कदम, अरुण ढवळे, सुभाष देशमुख,  विजयानंद साखरे गुरुजी, जयवंत कदम, दशरथ ससाणे, संजय राजमाने, अभिजित दुदुस्कर, निलेश गायकवाड, सागर शिवणकर, पृथ्वीराज कदम, मुन्ना मुसळे, सुरेश भोसले, महेश राजमाने, अशोक सावंत, अविनाश जगताप, रवी ससाणे, सुभाष मेरुलिंगकर, सुजित कदम, सचिन ससाणे, जितेंद्र भानसे, यांच्यासह  संचालक संजय दुदुस्कर , सुरेश भोसले, संदीप  माने, जयवंत वाघमारे, राजश्री कदम, ललिता करंजकर, सचिन ससाणे, जगन्नाथ पवार, शिवाजी जाधव, व सभासद उपस्थित होते . नुतन पदाधिकाऱ्यांचे यांचे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,मा . जि प शिक्षण व अर्थ सभापती वसंतराव मानकुंभरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ  शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, व समिर आतार यांनी अभिनंदन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप माने यांनी केले व आभार जयवंत कदम  यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!