रमेश गर्जे यांचे काम कौतुकास्पद- समीर शेख
भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी समाजाला चांगला संदेश देणारे कार्यक्रम राबवले असुन गावागावात, लोकालोकात जनसंपर्क वाढवल्यामुळे व चांगले उपक्रम राबवल्यानेच त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.
दरम्यान यावर्षीचा गणराया अवॉर्ड 2024 चा मान वेळे व पाचवड गावाने पटकावला.भुईंज ता.वाई येथील भुईंज पोलीस स्टेशन च्या वतीने श्री गणराया अवार्ड 2024 चे वितरण मोठ्या दिमागदार सोहळ्यात पाचवड येथील सह्याद्री मल्टीपर्पज हॉल येथे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी वाई उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भुईंज पोलीस स्टेशन सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, प्रदीपसिंग परदेशी, पाचवड गावचे सरपंच महेश गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले की गणराया अवॉर्ड वितरणास इलेक्शन व बंदोबस्त यामुळे उशीर झाला भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांची काम करण्याची पद्धत चांगली आणि कौतुकास्पद असून त्यांचे कार्य वाखण्याजोगे असल्याचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीतून जाणवत आहे. त्यांनी प्रशासन आणि लोकांच्या मध्ये सामंजस घडवत आपले प्रशासकीय काम योग्य पद्धतीने करीत आहेत. येणाऱ्या 2025 सालामध्ये सुध्दा हा कार्यक्रम अजून कसा जोरदार गाणी उठावदार होईल तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गणेश उत्सव मंडळांना यात सामील करून घेऊन ज्या गावात अजून एक गावी एक गणपती ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावा असेहि समीर शेख यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे म्हणाले की भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करीत गणराया आवर्ड साठी सहकार्य केले मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की माझ्या पोलीस स्टेशन एरियात डॉल्बी वाजत नाही आणि इथून पुढेही वाजणार नाही असेच आम्ही सर्व उत्सव पारंपारिक पद्धतीने पार पाडू व पोलीस अधीक्षक समीर शेख या कार्यक्रमाला आल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे साहेबांनी ज्या संकल्पना सांगितल्या त्या आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू असे सर्वांचे वतीने आपणास आश्वासन देतो असेही यावेळी रमेश गर्जे म्हणाले.
यावेळी गणराया अवार्ड 2024 प्रथम क्रमांक पाचवड येथील नवतरुण गणेश मंडळ व वेळे येतील रणसंग्राम गणेश मंडळ यांना विभागून देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजयनगर भुईंज येथील जय हिंद गणेशोत्सव मंडळ तर तृतीय क्रमांक राजधानी मित्र मंडळ ओझर्डे यांना मिळाले त्यांचे ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन मा. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्रक व जर्किन भेट देण्यात आले व अपघात स्थळी पोलिसांना ठिकठिकाणी मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
गणराया अवार्ड मध्ये परीक्षक असणाऱ्या सर्वांचा उचित सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी पाचवड येथील तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी व त.ल.जोशी विद्यालय वाईचे विद्यार्थी यांचा याठिकाणी सन्मान करण्यात आला.गणराया अवार्ड 2024 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुईंज पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे सचिन नलावडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलजी माने तर आभार भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे यांनी मानले.
