पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा – 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा, 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने “पंतप्रधान धनधान्य कृषी योजना” जाहीर केली आहे. राज्य सरकारांच्या मदतीने ही योजना संपूर्ण देशभरात राबवली जाणार असून, 1.7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
या योजनेंतर्गत 100 हून अधिक जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, सुधारित बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि वित्तीय सहाय्य यावर भर दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देतील.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, अन्नधान्य उत्पादन वाढवणे आणि कृषी क्षेत्राला बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
