पुणे बिबवेवाडीमध्ये भरदिवसा गोळीबार – तरुण गंभीर जखमी, परिसरात खळबळ
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पवन गवळी या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. या हल्ल्यात पवन गवळी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बिबवेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. बिबवेवाडी परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी, तरुणाने गोळी चुकवल्यामुळे तो बचावला होता. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
