प्रदूषण टाळण्यासाठी रायगवाच्या महिलांचा प्लास्टिक बंदी करण्याचा ठराव्
हळदी कुंकूच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिलांनी प्रदूषण मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकत समाजाला आदर्श देत गावात प्लास्टिक बंदी करायची व आजपासून प्लास्टिकचा वापर टाळून सर्वांनी कापडी पिशव्या वापरायच्या अशी शपथ घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
रायगाव ता. जावळी येथील महिला ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत, महिला बचत गट उमेद, अंगणवाडी रायगाव यांच्या सयुक्त विध्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक महिलांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनिता गायकवाड, सरपंच हसीना मुजावर, उपसरपंच समाधान गायकवाड, ग्रामसेवक रजनीकांत गायकवाड, राजश्री दुटाळ,अरुणा आगाटे, प्राथमिक शिक्षिका अस्मिता जाधव, अंगणवाडी सेविका मनीषा निकम, सुवर्णा बोडरे, दीपाली पवार, बचत गट उमेदच्या मनीषा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनिता गायकवाड यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करताना, गावात आपण महिलांनी पुढे येऊन राजकीय गट तट न ठेवता आपल्या गावाच्या विकासासाठी स्वतःपासून सुरुवात करूया व आपण काही निर्णय घेऊया. यावेळी महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कापडी पिशव्या वाटप केल्या त्यावेळी सर्व महिलांनी आपण प्रथम प्लास्टिक मुक्ती करण्याचा निर्णय घेऊ त्यामुळे प्रदूष्णाला देखील आळा बसेल व असा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी सर्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालक मंत्री आ शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच अनेक गावाच्या विकासाच्यादृष्टीने देखील ठराव घेण्यात आले. यामध्ये कचरा नियोजन, महामार्गवरील रायगावं फाट्यावरील पुलाची उंची वाढवीने. तिथे लाईटची सोय करणे,आणि महत्वाचे म्हणजे दर महिन्यातून एकदा सर्व महिलांनी एकत्र येऊन गावात ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अस्मिता जाधव, रजनीकांत गायकवाड, मनीषा निकम, मनीषा गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
फोटो ओळ :- रायगावं ता जावळी येथे महिलांनी प्लास्टिक बंदीचा ठरावं घेतला त्यावेळी सर्व महिला
