महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींचा सवाल – महाराष्ट्रात मतदार एवढे वाढले कसे?

     काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील मोठ्या वाढीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे पारदर्शकतेची मागणी केली असून, मतदारसंख्या एवढी वाढल्याचे स्पष्ट स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

पाच महिन्यातच सात लाख नव्या मतदारांची नोंदणी कशी?
राहुल गांधी यांनी सांगितले की,2019 ते 2024 या पाच वर्षांत 32 लाख नवीन मतदार वाढले.
पण फक्त पाच महिन्यातच तब्बल 7 लाख मतदारांची भर कशी पडली?
विधानसभा निवडणुकीत तर 40 लाख नवीन मतदार कसे आले?
त्यांनी विचारले की, हे मतदार कोण आहेत आणि त्यांची नावं कुठून आली?

महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मतदारसंख्या विसंगती
राहुल गांधींच्या मते,महाराष्ट्राची लोकसंख्या – 9 कोटी 54 लाख
निवडणूक आयोगानुसार मतदारसंख्या – 9 कोटी 70 लाखम्हणजेच, लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार नोंदले गेले आहेत.हे कसे शक्य आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की,निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक आयुक्त बदलला.सरकारने समितीतील निवडणूक तज्ज्ञांना हटवून भाजप समर्थकांना बसवले.मतदान यादीतील दलित, मुस्लिम, आदिवासी मतदारांची नावे गायब करण्यात आली.
विरोधकांनी या प्रकारावर आक्षेप घेतला, पण आयोगाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

 आम्ही आरोप करत नाही, पण पारदर्शकता हवी- राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले,”आम्ही निवडणूक आयोगावर थेट आरोप करत नाही. पण आम्हाला फक्त लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारयादीची सविस्तर माहिती हवी.”
त्यामध्ये नाव, पत्ता आणि फोटो असावा, असे त्यांनी मागणी केली.निवडणूक प्रक्रियेची चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले

संध्याकाळी ६ नंतर मतदानाच्या आकडेवारीत फेरफार?
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी संध्याकाळी ६ नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला.
काही ठिकाणी मतदान आकडेवारी अचानक वाढल्याचा आरोप झाला.
ईव्हीएममध्ये गडबड केली का? हा प्रश्न त्यांनी विचारला.

सरकार आणि निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
राहुल गांधी आणि विरोधकांनी आता निवडणूक आयोगाकडे औपचारिकरित्या चौकशीची मागणी केली आहे.त्यांनी सांगितले की, निवडणुकीत पारदर्शकता हवी.
मतदारसंख्येतील वाढीचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे. योग्य चौकशी न झाल्यास, विरोधक न्यायालयातही जाऊ शकतात.

   राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील मोठ्या वाढीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे आणि पारदर्शकता राखावी, अशी त्यांची मागणी आहे. आता या प्रकरणावर आयोग आणि सरकार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!