महत्त्वाच्या बातम्या

वाई-कळंब बस सेवा पुन्हा सुरू करण्याची प्रवाशाकडून मागणी 

    सातारा विभाग बस सुरू करण्यासाठी निरुत्साही 
धाराशिव जिल्ह्यातून कळंब येथून वाई ला येणारी बस सेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशी वर्गामधून संताप व्यक्त होत असून अत्यंत चांगल्या प्रकारे चालू असणारी ही बस सेवा महामंडळाला चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देत असताना बस पुन्हा सुरू होण्याबाबत सातारा विभागाने  दाखवलेल्या निरुत्साहाणे प्रवाशी वर्ग नाराज झाला आहे.
     कळंबवरून सकाळी 9 वाजता व वाईवरून सकाळी 6-45 ला सुटणारी ही बस सेवा सद्या लालपरीला सुगीचे दिवस आलेत. दिवसेंदिवस प्रवासी वाढत आहे. वाईकरांच्या सततच्या मागणी दखल घेत धाराशिव विभाग नियंत्रक यांनी कळंब-वाई हे नियमीत बससेवा बार्शी- येरमळा- कुर्डुवाडी- पंढरपूर- म्हसवड -दहिवडी -सातारा -वाई अशी चालवण्यात येत होती, कळंबवरून सकाळी 9वाजता व वाईवरून सकाळी 6-45ला सुटणारी ही बस सेवा नियमीत चालू ठेण्यासाठी जी तत्परता दाखवावयास पाहिजे ती न दाखविल्यामुळे ही बस सेवा बंद झाल्याने  वाई सातारा या परिसरातुन जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाश्यांची मोठी गैरसोय होऊ लागली, प्रवाशी वर्गाचा मोठा प्रतिसाद या बसला मिळत होता , मात्र सातारा विभागातील काही अधिकारी वर्गाने कागदपत्रे नाचवत नियमीत बस बंद करण्याकरिता प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
       धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून ही बस बस सेवा लवकर सुरू करावी अशी मागणी होत आहे,कळंब येथून बार्शी, येरमळा  मांढरदेवी, महाबळेश्वरला येणार वर्ग देखील मोठा असून धाराशिव विभाग नियंत्रकांनी देखील ह्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन ही बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, वाई,पाचवड,उडतरे अश्या ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त असणारी ही महत्वाची बस सेवा सबंधित विभागाने पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!