महत्त्वाच्या बातम्या

आनंदोत्सव 2025 कार्यक्रमास प्रेक्षकांची गर्दी

     ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘आनंदोत्सव-२०२५’ या संगीत समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई  उपस्थित राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून या संगीत समारोहाचे भव्य आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांना उत्तम संगीत कार्यक्रमाची पर्वणी उपलब्ध होत असते. आपली कलासंस्कृती जपणाऱ्या या आनंदोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मा. ना. शंभूराज देसाई  यांनी स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचे यावेळी अभिनंदन केले व या उपक्रमासाठी मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच यावेळी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आदरणीय आशाताई भोसले यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आदरणीय आशाताई भोसले यांचे स्वागत करत मा. ना. शंभूराज देसाई यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी मंत्री मा. प्रकाशजी आबिटकर, मा. भरतजी गोगावले, अभिनेते-दिग्दर्शक मा. प्रवीणजी तरडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!