महत्त्वाच्या बातम्या

क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न

    

     क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र 

जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा, टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 

टेनिस क्रिकेट शालेय कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धा 14 व 17 वर्षे वयोगट मुले व मुली क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड या ठिकाणी आयोजित केल्या होत्या या स्पर्धेसाठी सांगली, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्याचे संघ उपस्थित राहिले होते. स्पर्धेचे उदघाट्न कृषिरत्न श्री. विश्वंभर बाबर सर यांच्या हस्ते झाले. यावेळी आदर्श मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेन्ट जॉन, समन्व्यक अभिजित सावंत, नामदेव शिंदे, चंद्रकांत तोरणे उपस्थित होते स्पर्धेमध्ये यश मिळवलेले संघ पुढीलप्रमाणे आहेत 

14 वर्ष मुले : प्रथम क्रमांक : सातारा 14 वर्ष मुली : प्रथम क्रमांक :सांगली द्वितीय क्रमांक : सातारा 

17 वर्ष मुले प्रथम क्रमांक : रत्नागिरी,द्वितीय क्रमांक : सातारा,

तृतीय क्रमांक : सांगली म.न.पा.

17 वर्ष मुली : प्रथम क्रमांक : रत्नागिरी,द्वितीय क्रमांक : सांगली,

तृतीय क्रमांक : सातारा सर्व विजयी संघांची शालेय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे विजयी संघाना म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सखाराम बिराजदार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले, खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी जेवणाची व्यवस्था आदर्श मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बाबर यांनी केली होती, यशस्वी संघाचे जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, रवि पाटील, सचिव टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मिनाक्षी गिरी यांनी अभिनंदन केले,

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री. तुकाराम घाडगे, पांडुरंग भोसले, चंद्रकांत तोरणे, यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!