महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये राजकीय संघर्ष! सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना टोला – “तिकडे सगळं हायजॅक झालंय, तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या”!

   बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. परळी भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर पंकजा मुंडे यांनी “मला आष्टी मतदारसंघाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल” असं वक्तव्य केलं. यावर सुरेश धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 सुरेश धस यांचा पलटवार

सुरेश धस म्हणाले, “पंकजा ताईंनी त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. तिकडे सगळं हायजॅक झालंय. आमचं आष्टी भाजपचंच आहे, पण तुम्ही तुमच्या मतदारसंघात लक्ष द्या. तिथल्या गाळे, जमिनी हडप झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या. आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्यावर धोपाटणं टाकून काही होणार नाही.”

 पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

या टीकेला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “बीडवर माझं प्रेम आहे. आता इथं जास्त वेळ द्यावा लागेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडला, त्यामुळे आता इथं भाजपचं प्रेम जपावं लागेल.”

 भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी?

या वादामुळे बीड जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाचा भाजपला फटका बसेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!