महत्त्वाच्या बातम्या

महाकुंभ महाअधिवेशन मेळाव्याच्या नियोजनाकरिता बैठकीचे आयोजन

     शासकीय विश्राम गृह कराड येथे कराड तालुका अध्यक्ष रघुनाथ तडाके, मंगेश गायकवाड यांच्या नेतृत्वात 1 मार्च रोजी असणाऱ्या महाकुंब महाअधिवेशन मेळाव्याच्या नियोजनाकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे तसेच प्रदेशअध्यक्ष कैलास दादा खंदारे ह्यांच्या नेतृत्वात काम करत असलेले लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हा अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य, खादी ग्राम उद्योग संचालक खंडाळा माननीय बाळासाहेब गेनबा जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी बाळासाहेब जाधव म्हणाले, हा महाकुंब मेळावा समाजाच्या हिताचा मेळावा असून उद्या मुलांच्या भवितव्यासाठी, रोजगारासाठी लहुजी शक्ती सेना काम करत आहे. अ ब क ड वर्गीकरण हा समाजाच्या हिताचा प्रश्न आहे. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुद्धा करण्यात आल्या. तसेच सुरज कैलास केंजळे यांची  कराड तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी सातारा शहर संपर्क प्रमुख रामभाऊ पाटोळे, खंडाळा तालुका अध्यक्ष कैलास भिसे, जावळी तालुका अध्यक्ष मोहन खुडे, कोरेगाव तालुका अध्यक्ष सुनील भिसे, फलटण तालुका अध्यक्ष आनंद भिसे (पाटील )सचिन बडेकर, अभिजित तडाके, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!