महत्त्वाच्या बातम्या

अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न

सातारा: अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्यामध्ये अग्निवीर सैन्यभरतीची प्रक्रिया, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्नल, प्रशांत सिग, डायरेक्टर आर्मी रीक्रूटिंग ऑफिसर, कोल्हापूर, मा. आशिष नरहरी बारकुल, उप विभागीय अधिकारी, सातारा व लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (निवृत्त), उपसंचालक सैनिक कल्याण विभाग, पुणे तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा व पुणे यांच्या अथक प्रयत्नाने अग्निवीर सैन्य भरती अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडली. या भरती प्रक्रियामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयातील व उत्तर गोवा येथील ९००० युवकांचा सहभाग होता. भरती प्रक्रियासाठी मैदानी चाचणी व मेडिकलसाठी कॉल लेटर द्वारा बोलविण्यात आले होते. त्यामधील ४००० अग्निवीर सैनिक शाररीक व मेडिकलमध्ये उतीर्ण झाले आहेत. यानंतर, अंतिम निवड प्रक्रिया आर्मी रीक्रूटिंग ऑफिस, कोल्हापूर यांचेकडून मेरिटप्रमाणे कॉल लेटरद्वारे संबंधित अग्निवीरास कळविण्यात येईल असे कर्नल. प्रशांत सिंग, डायरेक्टर आर्मी रीक्रूटिंग ऑफिसर, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!