महत्त्वाच्या बातम्या

अनाथ निराधार लोकांना जपणाऱ्या यशोधन संस्थेस शासन स्तरावर मदतीसाठी प्रयत्न करणार- अजितदादा पवार 

      यशोधन संस्थेच्या माध्यमातून बेवारस, बेघर झालेल्या अनाथांची सेवा करून या लोकांचा  आधार बनलेल्या समाजसेवक रवी बोडकेचे योगदान महान आहे. साताऱ्याहून पुण्याकडे जाताना खंबाटकी घाटानजीक वेळे (ता वाई) गाव लागते. तेथे महामार्गाच्या पूर्वेला काही अंतरावर यशोधन अनाथाश्रम आहे. यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो अनाथांना, बेघरांना, मनोरुग्णांना समाजिक प्रवाहात आणले आहे.

      शासन स्तरावर यशोधन संस्थेसाठी  मदत मिळावी यासाठी आपण नक्की पर्यन्त करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. मुबंई येथे झालेल्या भेटीप्रसंगी त्यांनी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  व समाजसेवक रवी बोडके यांच्याकडून संस्थेची माहिती घेतली.यावेळी संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या गोशाळेसंबंधी देखील माहिती घेतली. ज्या पद्धतीने ही संस्था रवी बोडके चालवत आहेत ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. घरात एखादा वेडा असेल तर तो सांभाळणेही कुटुंबासाठी मोठे दिव्य असते  मात्र या विनाअनुदानित लोकांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून चालवत असलेल्या संस्थेत शेकडो अनाथ, निराधार, मतिमंद लोकांना एकत्र ठेवून त्यांना सांभाळणे नक्कीच सोपी गोष्ट नाही. बोडकेंच्या या कार्यास माझा सलाम आहे. जिल्ह्यात ज्यावेळी माझा दौरा असेल त्यावेळी नक्कीच यशोधणला भेट देईन असेही यावेळी अजित दादांनी सांगितले.
       यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोडके यांनी या संस्थेचे कामकाज कसे चालते व तेथील लोकांची कशी सेवा करून ज्यांचा पत्ता समजतो त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठविले जाते याबद्दल माहिती सांगितली. यासाठी लागणारा खर्च करताना कशी तारेवरची कसरत करावी लागते हे देखील सांगितले.
यावेळी रवी बोडके यांनी पवार यांना यशोधन संस्थेची माहिती पुस्तक भेट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!