अपशिंगे मिलिटरी येथे कै. शहीद जवान शंकर व्यंकट निकम यांची 61 वी पुण्यतिथी साजरी
अपशिंगे मिलिटरी गावाचे सुपुत्र आणि भारतमातेचे वीर जवान, शहीद शंकर व्यंकट निकम यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. १८ मे १९५७ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण करताच त्यांची जम्मू आणि काश्मीरमध्ये ०६ बटालियनमध्ये नियुक्ती झाली होती. २१ जून १९६४ रोजी, कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अपशिंगे मिलिटरी गावामध्ये माननीय आमदार मनोज दादा घोरपडे, सीआरपीएफ बटालियन, पुणे येथील अधिकारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या महान सुपुत्राला आणि त्यांच्या सर्वोच्च त्यागाला विनम्र अभिवादन केले. त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला शतशः नमन करण्यात आले.
