महत्त्वाच्या बातम्या

माण खटाव मधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

      माण तालुक्यातील आंधळी व रानंद धरण तर  खटाव तालुक्यातील येरळवाडी आणि नेर हे मध्यम प्रकल्प सततच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. या सर्व प्रकल्पांना विसर्ग नियंत्रण यंत्रणा नसल्याने दोन्ही तालुक्यात अलर्ट राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे येरळा व माणगंगा नद्यांची पातळी वाढून नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू शकतो हे लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायती नगरपंचायती आणि नगरपरिषदांना सतर्क राहण्याच्या सूचना सिंचन विभागाने दिल्या आहेत.

     माण तालुक्याला पूर्व मोसमी पावसाने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 7.43 दलघमी क्षमतेचे आंधळी धरण आणि 6.42 दलघमी क्षमतेचे राणंद  धरण भरले होते. आंधळी धरणातील विसर्ग माणगंगा नदीतून म्हसवड मार्गे राजेवाडी धरणाकडे जातो. माण आणि खटाव तालुक्यातील येरळवाडी नेर आंधळी आणि राणंद  सारख्या मध्यम प्रकल्पांना विसर्ग नियंत्रण यंत्रणा नाही. सदर धरणे द्वार विहिरीत असल्याने सगळा विसर्ग नदीपात्रात जातो सध्या ही सर्व धरणे 100% भरले आहेत.त्यामुळे आता पडणाऱ्या पावसाचे सर्व पाणी या धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात येत आहे परिणामी नद्यांची पाणी पातळी वाढत आहे.येणाऱ्या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने. येत्या दिवसांमध्ये मोठा पाऊस झाला तर या धरणांमधील विसर्ग ही मोठ्या प्रमाणावर वाढवून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. येरळा आणि मानगंगा नद्यांच्या काठावर अनेक गावे शहरे आणि वस्ती आहेत या नद्यांवर अनेक पूल आहेत पाणी पातळी वाढल्यावर मोठा धोका उद्भवू शकतो हे ध्यानात येऊन कृष्णा सिंचन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी नदीकाठी न जाण्याबरोबर संबंधित ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपरिषद आणि अनियंत्रित विसर्गाबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!