महत्त्वाच्या बातम्या

अपशिंगे या गावाने भारतीय सीमेच्या रक्षणासाठी सर्वोच्च समर्पणाची भावना दिली आहे-ह.भ.प सागर महाराज पवार 

सातारा:   मिल्ट्री अपशिंगे सैनिकांचे गाव आहे. या  गावाने भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःचे रक्त  सांडले  आहे. पहिल्या महायुद्धामध्ये या गावातले 46 जवान शहीद झाले त्यावेळी स्वतः इंग्रजांनी या गावांमध्ये  शहीद स्मारक उभारल आहे. 1962 चे भारत-चीन,1965 भारत-पाकिस्तान युद्ध,1971 चे भारत-बांगलादेश युद्ध, कारगिलचे युद्ध असेल किंवा आझाद हिंद सेना यासाठी अपशिंगे या गावाने भारतीय सीमेच्या रक्षणासाठी सर्वोच्च समर्पणाची भावना दिली आहे. हीच समर्पणाची भावना संतांनी जगली, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते हभप सागर महाराज पवार यांनी केले.

       अपशिंगे मिलिटरी  ता. सातारा  येथील ४५ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यावेळी शहीद स्मारकास दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी केशवमहाराज कुंभार, संतोष माने, पुंडलिक आळंदीकर, प्रवीण जाधव, गुरुवर्य गोपाळमहाराज अथणीकर,विशाल पवार,संदीप साळुंखे,हनुमंत निकम,शंकर निकम, सुनील सपकाळ, बाळकृष्ण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे सागर महाराज पवार म्हणाले, संत जीवन कसे जगावे हे शिकवतात. संत हे संघर्षशाली जीवन जगून दाखवतात. संत जगाला दिशा देतात.संतांच्या ठाई समर्पणाची भावना होती त्यागाची भावना होती. आपल्या उत्कट भक्तीने संतांनी जगाला आपलं केले.विश्वात्मकाचा विचार संतांनी दिला.संतांच्या समर्पणाची भावना सीमेवरचा जवान जगत आहे. घराघरात देशसेवा करणाऱ्या जवानांचे असणारे हे मिल्ट्री अपशिंगे माझ्या सातारा जिल्ह्यात असल्याचा मला अभिमान आहे. यावेळी पवार यांनी पुलवामा हल्ल्याचा रोचक इतिहास सांगितला. त्यावेळी जनसमुदायाच्या अंगावरती शहारे उभे राहीले होते. पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!