अभिजीत दादा कदम करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वृषाली महिंद्रकरचे उज्वल यश
शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम जुनिअर कॉलेज एरंडवणे, पुणे या ठिकाणी अभिजीत दादा कदम करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये खंडाळा येथील राजेंद्र ज्युनिअर कॉलेज बारावी शास्त्र विद्यार्थिनी कु.वृषाली अशोक महिंद्रकर हीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. “आदर्श उद्योगपती रतन टाटा” विषयावर वृषालीने आपले वक्तृत्व सादरीकरण केले. स्पर्धेसाठी प्रा. प्रवीण बोरगावे, प्रा.खांडके, प्रा. जयप्रकाश गेजगे, प्रा.अमेय इनामदार यांनी मार्गदर्शन केले.
या उज्वल यशासाठी खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा संस्थेचे अध्यक्ष शंकररावजी गाढवे,सचिव अनिरुद्ध दादा गाढवे व सर्व संचालक मंडळ, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. हणमंत जाधव व प्राध्यापक वृंद राजेंद्र विद्यालय प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्या सौ.अरुंधती गाढवे उपमुख्याध्यापिका सुशीला मोहिते,पर्यवेक्षक धनंजय महामुनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी वृषाली चे अभिनंदन केले.
