महत्त्वाच्या बातम्या

पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना आता नो पास

   राज्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.पाचवी ते आठवीमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास  सरसकट पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्राने रद्द केलेला आहे.केंद्राने आरटीई कायद्यामध्ये मोठा  बदल केला आहे. पाचवी ते आठवी मध्ये वर्गातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या दोन महिन्यांमध्ये फेर परीक्षा देण्यात येईल पण त्याही परीक्षेत विद्यार्थी नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे. आरटीई च्या कायद्यानुसार कोणत्याही मुलाला आठवी इयत्ता पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही हे ही या मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.  यापूर्वी पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नापास केले जाऊ नये असा निर्णय करण्यात आला होता पण आता या निर्णयात अमुलाग्र बदल करून मुलांची शैक्षणिक सुधारणा होण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

       देशातल्या मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, ओरिसा, कर्नाटक, दिल्ली, या राज्यांनी पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. यावर शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी  म्हणाले, केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे मुलांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाईल तसेच मुलगा, विद्यार्थी व शाळा सजक होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!