मार्डीत ९ वर्षाच्या बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
मार्डी ( ता. माण )येथे शंभूराज शशिकांत राजमाने वय ९ वर्ष इयत्ता ३ री मध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शंभूराज शाळकरी मुलगा प्राथमिक शिक्षिका सुनीता चांदकिरण नलावडे यांच्याकडे तबला व पेटी वाजवणेच्या क्लाससाठी नलवडे यांच्या घरी जात असे. दि.15 एप्रिल रोजी दुपारी साधारणपणे ३ वाजण्याच्या सुमारास सायकल घेऊन तो क्लासला गेला होता . तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणुन पालकांनी नलवडे व इतर मुलांना विचारले असता तो क्लासला आला नाही असे सांगण्यात आले. शोधाशोध केल्यानंतर नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्यात पडुन मृत्यू झाल्याचे दिसून आले. शेजारीच त्याची सायकल व चप्पल पडल्याचे दिसून आले .
संबंधित शिक्षिका या जि.प. प्राथमिक शाळा कदमवस्ती (मोही) या ठिकाणी कार्यरत आहेत . नुकत्याच कीर्तनकार म्हणुन त्या कीर्तन भजन करत असतात . मोजकीच मुले क्लास ला येत असतात त्यात हा सायकल घेऊन आलेला मुलगा त्यांना व कुटुंबातील सदस्य यांना कसा दिसला नाही या बाबतीत मात्र मार्डी ग्रामस्थ शंका उपस्थित करत आहेत .
पोलीस पाटील यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . पोस्ट मार्टेम करून रात्री उशिरा बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी मृत मुलाचे पालक शशिकांत उत्तम राजमाने यांनी दहिवडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आई वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
मृत शंभूराज हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू असल्यामुळे तो आई वडील, नातेवाईक व गावकऱ्यांचा अत्यंत लाडका होता त्यांच्या जाण्याने गावकरी व आई वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहताना अनेकांचे डोळे पाणावले.
