आंधळी गटाच्या वतीने ना. जयकुमार गोरे यांचा भव्य सत्कार सोहळा
आंधळी(ता. माण ) या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा आंधळी जिल्हा परिषद गटाच्या वतीने शनिवार दि.२९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य सत्कार सोहळा व आंधळी ग्रामपंचायतीचा भव्य लकी ड्रॉ उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. ना. जयकुमार गोरे यांच्यावर आंधळी जिल्हा परिषद गटातील जनतेने गेल्या सतरा वर्षांपासून भरभरून प्रेम केले आहे. माजी. आ. स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांची एक हाती सत्ता असताना नवख्या जयकुमार गोरे यांना या गटातील जनतेने बहुसंख्य मताने जिल्हा परिषदेला निवडून दिले. २००९ च्या विधानसभेला त्यांना या गटातील जनतेने मोठे मताधिक्य दिल्यामुळे आमदारकी मिळविता आली. चारही विधानसभेला या गटातून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या गटातील जनतेचे त्यांच्यावर आंधळे प्रेम आहे.
आंधळी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपासाठी ४० लाख रुपये देणगी देऊन देवीचा आशीर्वाद व गावकऱ्यांचे प्रेम मिळविले. त्याच श्री.महालक्ष्मी मंदिराच्या समोर नामदार जयकुमार गोरे यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे. व आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी ग्रामपंचायतचा कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ Curfew योजना सुरू केले आहे त्या योजनेचा नामदार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांची आदर्श कामगिरी
ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा यासाठी नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरावे यासाठी भव्य लकी ड्रॉ बक्षीस योजना सुरू केली. त्यामुळे गावातील घरपट्टी पाणीपट्टी नागरिकांनी वेळेवर भरली आणि ग्रामपंचायत आदर्श व समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागली. कर वसुलीसाठी लकी ड्रॉ योजना सुरू करणारी आंधळी ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली ठरली त्यामुळे दादासाहेब काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आंधळीच्या श्री महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद ना.गोरेंच्या पाठीशी.
ना. गोरे हे श्री महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद घेण्यास कधी चुकत नाहीत. त्यांनी या मंदिरासमोरील एका कार्यक्रमात त्यांनी घोषित केले होते की ४० लाखाचा मंडप बांधून देणार व दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे आंधळी गाव आंधळी गटातून नामदार गोरे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. म्हणून याच देवीच्या मंदिरासमोर नामदार गोरे यांचा भव्य सत्कार सोहळा होणार असे आयोजक सरपंच दादासाहेब काळे यांनी
