तडवळेच्या झांजुर्णे कुटुंबाचा दीर्घकालीन सरपंचपदाचा विक्रम
सातारा: तडवळे ता. कोरेगाव येथील झांजुर्णे कुटुंबाने दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५३ वर्षे सरपंचपदी राहून जनतेची सेवा केली. झांजुर्णे कुटुंबाच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी निवासस्थानी या विक्रमाबद्दल श्रीमंत झांजुर्णे व मोनाली झांजुर्णे यांचा विशेष सत्कार केला.एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी ५३ वर्षे तडवळे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले, ते म्हणजे, सैनिक स्वर्गीय सर्जेराव ज्ञानू झांजुर्णे ग्रामपंचायत स्थापनेपासून (३९ वर्षे १८ एप्रिल १९५२ ते २५ एप्रिल १९९१) त्यांच्या अखेरपर्यंत, त्यांचा मुलगा श्रीमंत सर्जेराव झांजुर्णे (१० वर्षे २४ जून, १९९३ ते २३ जून २००३) आणि त्यांची नात सून मोनाली नीलेश झांजुर्णे (४ वर्षे २४ जून २०१८ ते १ जुलै २०२२), १३ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वांना विचारात घेऊन विकासात्मक, आध्यात्मिक, शेतीविषयक, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन तसेच गावामध्ये सर्व घटकांना विचारात घेऊन सर्वधर्म समभाव निर्माण केला आहे. हे कुटुंब कायम गावाच्या सुख दुःखात सहभागी असते. नेहमी दूरदृष्टी ठेऊन आदर्श गाव बनवण्साठी झटणारे कुटुंब अशी झांजुर्णे कुटुंबाची ओळख निर्माण झाली आहे.
