आंबोली परिसरात भातशेतावर जाऊन मतदानाबाबत जनजागृती
आंबोली ता.खेड येथील परिसरातील शेतक-यांची भात कापणीची लगबग चालु असुन तहसील कार्यालय खेड स्वीप पथकाच्या वतीने भात शेतावर जाऊन मतदान जागृती केली जात आहे. अशी माहिती नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीत ५०% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांतील वाडीवस्तीवर विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे.
197 खेड आळंदी मतदार संघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मा. श्री.अनिल दौंडे, सहायक निवडणूक निर्णयअधिकारी तथा तहसिलदार मा. श्रीम. ज्योती देवरे, स्वीप नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे अविनाश शिंदे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ५०% पेक्षा कमी मतदान झालेल्या आंबोली, पाईट, कळमोडी, येणिये बु., वाजवणे परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे.
यावेळी मतदान जनजागृती पथकाचे अविनाश शिंदे,संजय घुमटकर उपस्थित होते.
*आम्ही मतदान करणारच*
खेडच्या आदिवासी भागात भात कापणीची लगबग चालू असुन सर्वच मतदार भात कापणीच्या कामांत व्यस्त आहेत. खेड विधानसभा स्वीप पथकाने भात शेताच्या बांधावर जाऊन सर्व शेतकरी बंधू भगिनींना येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला सर्व शेतकरी बंधूभगिनींचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.आम्ही मतदान करणारच असा विश्वास व संकल्प शेतक-यांकडून केला जात आहे.
