महत्त्वाच्या बातम्या

आज देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

     परीक्षेच टेन्शनच नको असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.पंतप्रधान मोदी यांचा ‘परीक्षे पे चर्चा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. पंतप्रधान हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. 

नरेंद्र मोदी यांनी मुलांशी संवाद साधत असताना तुम्ही परीक्षेचा टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका आणि ज्या विषयाची भीती वाटत आहे त्या विषयाची आधी तयारी करा असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमासाठी 3.30 कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि 20.71 पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमात प्रत्यक्षात भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!