महत्त्वाच्या बातम्या

आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला सांगा- अनुप गुप्ता 

 

 

अग्रसेन ट्रस्टकडून निगडीतून शोभयात्रा, विद्यार्थी सत्कार 

पिंपरी (प्रतिनिधी) “अग्र” म्हणजे अति उत्तम, सर्वोत्तम असा अर्थ आहे.अग्र ही पदवी आहे.आपल्या आगरवाल पूर्वजांचा इतिहास महान आहे. आपला इतिहास आणि संस्कृती आपल्या नव्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजेत. त्यामुळे समाजासोबत नव्या पिढीची नाळ जोडली जाईल.असे उदगार अखिल भारतीय अग्रवाल कॉन्फरन्सचे अध्यक्ष 

अनुप गुप्ता यांनी काढले. श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण यांच्या वतीने अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे 130 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आहार तज्ज्ञ अतुल शहा,पंच समिती सदस्य वेदप्रकाश गुप्ता,रामअवतार आगरवाल,माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, राजकुमार गुप्ता,विनोद बन्सल, अशोक बन्सल, सुभाष बन्सल, श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आर. आगरवाल,सचिव सुनील जे. आगरवाल,विनोद मित्तल, धर्मेंद्र आगरवाल, गौरव आगरवाल,आनंद आगरवाल, सागर आगरवाल, जोगिंदर मित्तल, सत्पाल मित्तल, संदीप गुप्ता,महिला अध्यक्ष मीनल जाजोदिया,अनिता जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. शहा म्हणाले कि, दिवसातून एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी, आणि तीन वेळा जेवतो तो रोगी, अशा शब्दांत अन्न ग्रहणाचे नियम सांगितले.पुढे म्हणाले कि,आज रोज देशात 10 हजार नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडत आहे.यामुळे आपण सुदृढ आहोत या भ्रमात राहू नका. निरोगी राहण्यासाठी वेळीच सावध व्हा. जेवणात फळभाज्या, फळे यांचा वापर करावा तसेच उपवास करण्याचा सल्ला दिला.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांनी दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आरोग्य विमा काढण्याकरिता ट्रस्टला दोन लाख रुपये देणगी जाहीर करीत म्हणाले कि, पूर्वी अत्यल्प नागरिकांमध्ये जयंती साजरी होत असे आता नागरिकांच्या सहकार्याने आज जयंती निमित्ताने सुमारे बाराशे ते दीड हजार समाज बांधव एकत्र येतात.याबद्दल आभार मानले. ट्रस्टच्या वतीने मोफत दवाखाना चालवला जातो, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे, सामूहिक विवाह सोहळा, दिवाळी मिलन, मोफत औषधोपचार करून वारकऱ्यांची सेवा केली जाते.

 

     *जल्लोषात शोभयात्रा* 

श्री अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेची भव्य निगडी, प्राधिकरण चिंचवड परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या शोभयात्रेचे उदघाटन अखिल भारतीय अग्रवाल कॉन्फरन्सचे अध्यक्ष अनुप गुप्ता यांच्या हस्ते आले.

शोभायात्रेस प्रारंभ बिग इंडिया चौकातून झाला. ही भव्य मिरवणूक ढोल लेझीम, रथ, उंट, घोड्याने पायी भेळ चौक मार्गे निघाली. श्री अग्रसेन गार्डन,-भक्ती शक्ती जवळ असलेल्या अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्या जवळ विसावा घेतला.

सहभागी झालेल्या आगरवाल बांधवांनी “जय अग्रसेन” अशा घोषणा देत महाराजांवरील प्रेम व्यक्त केले. यावेळी माजी उपमहापौर शैलेजा मोरे,राजेंद्र बाबर,सुलक्षणा धर,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, अध्यक्ष सुनील आर आगरवाल आदी मान्यवरांनी अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.

या शोभायात्रेत शेकडो नागरिक सर्व कुटुंबासह सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ही शोभा यात्रा दुचाकीने मुंबई पुणे महामार्गाने चिंचवड येथील अग्रसेन भवनकडे मार्गस्थ झाली.

 

श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरण कार्यकारिणी संस्थापक सदस्य, पंच कमिटी सदस्य श्री अग्रसेन युवक संघ,डॉक्टर सदस्य, अग्रवाल समाज महिला मंडळ यांनी कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेतला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!