पुरुषोत्तम जाधवांची जनसंवाद यात्रेला सुरुवात
सातारा- पुरुषोत्तम जाधव शिवसेना ( सातारा जिल्हा प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेस 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. ही जनसंवाद यात्रा 9 दिवस असणार आहे . वाई , महाबळेश्वर, खंडाळा या तिन्ही तालुक्यातील सर्व गावांमध्ये मतदारांशी थेट संवाद पुरुषोत्तम जाधव साधणार आहेत.
दि 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर श्री क्षेत्र महाबळेश्वर ते राजमाता अहिल्यादेवी पुतळा चौक लोणंद असा हा जनसंवाद यात्रेचा प्रवास असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदार संघामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाही विरुद्ध लढा दिला पाहिजे तरच आपल्या मतदार संघाचा विकास होईल. मतदार संघाच्या परिवर्तनासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला असून आता या मतदार संघावर भगवा नक्कीच फडकेल असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर पुरुषोत्तम जाधव यांनी महाबळेश्वर -प्रतापगड येथून जनसंवाद यात्रेचा श्री गणेशा केला.
यावेळी संजयसिंह देशमुख वाई विधानसभा संघटक, वनिताताई जाधव उपजिल्हा संघटिका महिला आघाडी, तसेच संजय शेलार महाबळेश्वर तालुका प्रमुख पूर्व, संभाजी भिलारे महाबळेश्वर तालुका प्रमुख पश्चिम, विजय नायडू महाबळेश्वर शहर प्रमुख, राहुल शिंदे पाचगणी शहर प्रमुख, भूषण शिंदे खंडाळा तालुका प्रमुख, ज्ञानेश्वर भांडे शिरवळ शहर प्रमुख, भानुदास जाधव संचालक खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, चंदू गुरुजी जेष्ठ शिवसैनिक तथा लडकी बहीण योजना वाई विधानसभा निमंत्रित सदस्य,सागर सपकाळ, राजेश सपकाळ, नारायण शेलार, सचिन आवरे, मारुती सपकाळ, अविनाश ढेबे सरपंच, सविता पुजारी , प्रसाद ननावरे , तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या सभेत शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले की , अनेक वर्षांपासुन एकाच घराण्याने लोकसभा, विधानसभा, सरपंच परिषद, बाजार समिती, साखर कारखाने, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, सरपंच परिषद अशा अनेक सत्ता स्वतःकडे ठेवूनही मतदार संघाचा विकास करू शकले नाही. परंतु आता परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
