आर्टिफिशियल इंटेलिजन्स
कृत्रिम बुद्धिमत्ता ही अशी यंत्र तयार करण्याची प्रक्रिया आहे जी माणसाप्रमाणे विचार करू शकतात तसेच काही प्रकारे मानवी वर्तनाची नक्कल करू शकतात. आत्तापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर हा संगणक प्रोग्राम मध्ये फार वर्षापासून करतात हे आपणास माहिती आहे. परंतु सध्या आपल्या दैनंदिन जीवनात A.I चा वापर आपण करीत आहोत. उदाहरणार्थ गुगल असिस्टंट, मोबाईल मधील नेव्हिगेशन, अलेक्सा इ. ठिकाणी आपण वापर करतो.
भविष्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शक्तीवर चालणारे यंत्रमानव विविध क्षेत्रातील कार्य करण्यासाठी याचा वापर झालेला आपण पाहू शकणार आहोत. हेल्थकेअर मध्ये एखाद्या रुग्णाच्या शरीरात होणारे बदल अथवा भविष्यात होणारे रोग हे अगोदरच रोगाला समजणार आहेत. मेंदूमध्ये एखादी रक्तवाहिनी बंद असेल तर तिचे रूपांतर गाठीत होण्यासाठी किती दिवस लागतील आणि पाचव्या दहाव्या दिवशी तिचा आकार किती होईल व योग्य वेळी त्यावर उपचार घेतले नाहीत तर त्या रुग्णाचा मृत्यू कितव्या दिवशी होईल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून समजण्यास मदत होईल.
आर्टिफिशल इंटेलिजन्स ची सुरुवात अथवा स्थापना 1956 मध्ये शैक्षणिक विषय म्हणून करण्यात आली. एलन टुरिंग यांनी यामध्ये भरीव कामगिरी केली आहे यावरून आपणास भविष्य काळात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे रोबोट अध्यापन करण्यासाठी असतील यामध्ये असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सर्व विषय एकटेच शिकवतील व विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे सांगतील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोबोटची निर्मिती अक्षय माशेलकर यांनी केली आहे आणि त्याचे नाव “शिक्षा” असे ठेवले आहे.
येणाऱ्या काळात घरातील कामे करण्यापासून ते एक विश्वासू सल्लागार कामगार वकील चालक यांची जागा हे रोबोट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे मनुष्यापासून आपल्याकडे घेतील यात शंका नाही.
