उद्या मंत्री चषकमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे करणार बॅटिंग
दहिवडी (ता. माण)येथे २६ जानेवारी पासून मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून ३१ जानेवारी रोजी अंतिम सामने खेळवले जातील. यावेळी काही विशेष सामने होतील त्यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे बॅटिंग व बॉलिंग करणार असल्याचे आयोजक राहुल गोरे यांनी सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे क्रीडाप्रेमी माण व दहिवडी क्रिकेट क्लब यांच्या प्रेरणेतून साकारलेले मंत्री चषक २०२५ या स्पर्धेचे मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ६०.००० अरुण गोरे यांचावतीने, द्वितीय बक्षीस ४०.००० चिनमय कुलकर्णी व गणेश सत्रे यांच्यातर्फे, तृतीय बक्षीस, तृतीय बक्षीस २०.००० धनाजी जाधव, चतुर्थ बक्षीस २०.००० सयाजी मोरे (नगरसेवक ) इत्यादी मान्यवरांनी बक्षीसे दिली असून उद्योजक सागर घोरपडे यांच्याकडून युट्युब लाईव्ह देण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून नामवंत खेळाडू दहिवडे मध्ये दाखल झाले आहेत. सामने पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक क्रीडाप्रेमी देखील येत आहेत. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी अंतिम सामने होणार असून. त्या अगोदर दहिवडी येथील डॉक्टर, पोलीस, पत्रकार,व पोलीस आणि महसूल विभागातील महिलांचे देखील क्रिकेट सामने होणार आहेत.अशी माहिती स्पर्धेचे आयोजक दहिवडी क्रिकेट क्लब व राहुल गोरे यांनी दिली.
