महत्त्वाच्या बातम्या

इंग्रज अधिकारी ग्रँड डफ यांचे 4 वर्ष वास्तव्य असलेल्या निवास स्थानाच्या दक्षिण भागात आग

इंग्रज अधिकारी ग्रँड डफ यांचे 4 वर्ष वास्तव्य असलेल्या तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे अनेक वर्ष निवास स्थान आसलेल्या  दक्षिण भागात संध्याकाळी 7 वाजता आग लागली. सदर बाब अग्निशामक दलाला कळताच त्यांनी आग आटोक्यात आणली. सदर परिसरात उंच झाडे असून संपूर्ण परिसर हा गावातने वेढलेला आहे. सदर आगीची झळ या ऐतिहासिक बंगल्याला लागली असती तर एक ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्या आड गेला असता.

      मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून ग्रँड डफ यांची ओळख होती. सदर वास्तूची पड झड झाली असून संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने अशी आगीची संभावना नाकारता येणार नाही. तरी शासनाने या ऐतिहासिक वास्तुस पुन्हा झळाळी  द्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!