महत्त्वाच्या बातम्या

कराड उत्तर चे आमदार मनोज दादा घोरपडे यांची वेळू येथे शिवार फेरी

 कराड उत्तरचे आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांनी वेळू गावची शिवार फेरी केली. दरम्यान बेलेवाडी येथे तलावाची उंची वाढवणे व बांध रुंद करणे आणि पाणीसाठा वाढवणे त्यातून वाढलेल्या साठ्याचे इतर गावांना ते पाणी देऊ शकतो का या संदर्भात माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे आणि यांत्रिकी विभागाचे अधिकारीही शिवार फेरीसाठी बोलावलेले होते. यानंतर त्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये एक आगळावेगळा प्रकल्प तलाव जोड याची पूर्ण माहिती घेतली व त्याचे कौतुकही केले. यावेळी सुखदेव भोसले यांनी सांगितले की, डॉक्टर अविनाश पोळ सरांच्या माध्यमातून यासाठी हे 97 लाखाचा निधी राज्यसभेच्या खासदार आणू आगा यांच्याकडून प्राप्त झाला व त्या पुढचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांनी डीपी मधून केला. याचे वैशिष्ट्य हे आहे की सर्व पाणी ग्रेव्हीटीने एक दुसऱ्या तलाव्यात जाते, त्यांनी सांगितले की तलावा ची उंची जरी वाढली तरी आहे ही सिस्टीम सुद्धा व्यवस्थित वापरून वाढलेल्या पाण्याचा वापर अजून व्यवस्थित करता येईल, बेलेवाडी तलावावरून त्यांनी मोटरसायकल वरून प्रवास केला आणि प्रत्येक तलाव्या वरती जाऊन त्या तलावांची पाहणी केली.  त्यानंतर वेळूमध्ये सुरू असलेल्या शिवार फाउंडेशन आणि 
 से ट्रीज व लोकसहभाग यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे ते पाहिले त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना डंपरसाठी ची मागणी केली असता त्यांनी यांत्रिकी विभाग आणि जिल्हाधिकारी सातारा श्री संतोष पाटील सर यांना फोनवरून संपर्क करून या संदर्भात आपण काय करू शकतो यावरती चर्चा केली.       

         जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच आपण त्यांना ही डंपरची व्यवस्था करून देऊ यावेळी दादांनी हायवेचे कॉन्ट्रॅक्टर यांनाही फोन करून वेळूची अतिरिक्त मुरूम आणि माती उचलण्या संदर्भात चर्चा केली परंतु वाहतूक लांब असल्याने कॉन्ट्रॅक्टरनी या संदर्भात असमर्थता दर्शवली त्यानंतर लोकसहभाग आणि शिवार फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू असलेले डीप सीसीटी पाहिली. देवराई मध्ये केलेली वृक्ष लागवड माती नालाबांधातून काढलेले गाळ आणि रुंदीकरण हे सर्व पाहिले, आणि सुरू असलेल्या कामांचे तर कौतुक त्यांनी केलेच परंतु लवकरच बेलेवाडी तलावाची उंची वाढवून आपण ही समस्या कायमस्वरूपी सोडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ,आणि लवकरच याच्यावरती आपण कार्यवाहीला सुरू करू असे सांगितले. यावेळी वेळूचे सरपंच ननावरे सर उपसरपंच वैभव भोसले तसेच रोहित भोसले प्रवीण भोसले सतीश काका व मोठ्या संख्येने वेळू ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर पंचक्रोशीतील अनेक सरपंच माजी सरपंच यावेळी उपस्थित होते जयपुर   इथून सोमनाथ निकम मेजर ,ऋषिकेश तुपे पिंपरी, संतोष जाधव उपसरपंच बेलेवाडी, रंजना कणसे सरपंच बेलेवाडी, भानुदास माने माजी सरपंच बेलेवाडी ,राजेंद्र गाडगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट ,बोरगाव तुषार जाधव साप, भगवान कदम ग्रामपंचायत सदस्य साप ,सचिन बेलागडे सरचिटणीस तालुका कोरेगाव राष्ट्रवादी अजितदादा गट, सुहास पंडित सूर्ली माजी सरपंच ,विक्रम माने नगरसेवक रहिमतपूर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच दुर्योधन ननावरे यांनी शेवटी आभार व्यक्त केले आणि मुख्य तीन मागण्या म्हणजेच बेलेवाडी तलावाची उंची वाढवणे गाळ काढण्यासाठी डंपरची व्यवस्था करणे आणि दळणवळणासाठी रस्त्यांची सोय करण्याविषयीची मागणी दादांकडे केली या सर्व मागण्या आपण लवकरच पूर्ण करू असे दादांनी आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!