इंडिगो व आकासा विमान कंपन्यांच्या विमानात वारंवार बॉम्ब ठेवण्याची धमकी
इंडिगो व आकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी 5 विमानांना बॉम्ब असल्याच्या धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या व तपास करण्यास सुरुवात केली. विमान कंपन्यांना सतत बॉम्ब असल्याची धमकी येत आहे.आज शनिवारी असाच एक कॉल आला आणि 10 वेगवेगळ्या फ्लाईट मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही त्यासाठी एक सुची तयार करण्यात येत आहे व त्यांना नो फ्लाय सुचित समाविष्ट करण्यात येईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सोमवार पासून आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना सुमारे 70 वेळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली व यामुळे प्रवाशांच्या व चालकाच्या सुरक्षेसाठी मार्गात बदल करण्यात आला. तसेच त्यांच्या वेळेत देखील बदल केले गेले. यावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्यांविषयी मोठा निर्णय घेण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंतच्या सर्व धमक्या खोट्या ठरल्या आहेत.
मुंबईतून इस्तांबुलकडे निघालेल्या फ्लाईट 6E17 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांच्या व विमान चालकाच्या सुरक्षेसाठी आमची यंत्रणा काम करत आहे अशी माहिती दिली. काल दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानाला बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विस्तारा विमान फ्रॅंकफर्टच्या दिशेने वळवण्यात आले होते. आज सकाळी विमान कंपनीने ही माहिती दिली. तसेच शुक्रवारी बंगलूरू येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या विमान QP 1366 ला सुद्धा धमकी देण्यात आली होती. याची माहिती समजताच सुरक्षा यंत्रणेकडून त्याचा तपास सुरु करण्यात आला.
