महत्त्वाच्या बातम्या

पिस्तूल आणि काडतुसासह सापडलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस हवालदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, डायसप्लॉट, गुलटेकडी, स्वारगेट कॅनलजवळ एक व्यक्ती हातात अग्निशस्त्र घेऊन उभा असल्याचे समजले. त्यांनी तातडीने युनिट २ चे वरिष्ठ अधिकारी प्रताप मानकर यांना या माहितीसह कळविले, ज्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

प्राप्त आदेशानुसार, सह पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे ५०,४०० रु/-, एक सिल्व्हर पिस्तूल मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस सापडले. या घटनेची नोंद स्वारगेट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या कार्यात गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, स.पो.नि. अमोल रसाळ, अशिष कडकवेकर, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हणे, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ओम कुंभार, हनुमंत कांबळे, गणेश थोरे, विजय पवार, राहुल शिंदे, अमोल सरडे आणि नागेश राव यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!