महत्त्वाच्या बातम्या

इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज येथे आय क्यू एस सी अंतर्गत कार्यशाळा संपन्न

     इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज येथे आय क्यू एस सी अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेमध्ये धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रोफेसर डॉ. गणेश जाधव यांनी नमूद केले. सदर कार्यशाळेचे आयोजन आय क्यू ए सी समन्वयक प्राध्यापक डॉ देसाई यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली जाधव या होत्या. सदर कार्यशाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी आनंद कसा वृद्धीगंत करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ गणेश जाधव यांनी असे नमूद केले की, केवळ अर्थार्जनासाठी काम न करता त्यातून निखळ आनंद कसा मिळवावा हे जर शोधले तर निश्चितपणाने प्रत्येक जण सुखी आणि समाधानी होऊ शकतो. कोणत्याही संस्थेला विशिष्ट उंची गाठायची असेल तर प्रामाणिक सेवकांची तसेच कर्तव्यनिष्ठ स्टाफची अत्यंत आवश्यकता असते. अध्यक्षीय मनोगत मध्ये प्राचार्य वैशाली जाधव यांनी असे नमूद केले की, प्रामाणिकपणे कामाला जर न्याय दिला तर आनंदाला कोणताही पर्याय उरत नाही कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!