महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदें ची पहिली यादी जाहीर 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वायकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची साथ करत शिंदेंसोबत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते खासदार म्हणून जिंकूनही आले. त्यांनतर आता रवींद्र वायकर यांच्या पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहेत.

IMG-20241022-WA0042

IMG-20241022-WA0043

IMG-20241022-WA0044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!