CBSC परीक्षेबाबत नवीन अपडेट
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी ने 10 वी व 12 इयत्तेच्या परीक्षेची डेट शीट जाहीर केली आहे. या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील. दोन पेपर मध्ये गॅप दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना रिव्हिजन साठी वेळ मिळेल. दहावीचा पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा राहील.तर बारावीच्या पेपरची सुरुवात उद्योजकता या विषयापासून होईल. दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर नंतर 20 तारखेला विज्ञान विषयाचा पेपर घेण्यात येणार आहे. या दोन पेपर मध्ये चार दिवसांचा गॅप देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना रिव्हिजन साठी वेळ मिळेल. त्यानंतर 25 तारखेला समाजिक शास्त्र व 28 ला हिंदी अशा दोन पेपर मध्ये तीन दिवसांचा गॅप ठेवण्यात आला आहे. गणित विषयाचा पेपर 10 मार्चला घेण्यात येईल यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. बारावीचा विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स चा पेपर 21 फेब्रुवारीला होईल तर 27 फेब्रुवारीला केमिस्ट्री आणि 8 तारखेला गणिताचा पेपर होईल.अशाप्रकारे मोठ्या विषयांच्या पेपरमध्ये सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
सीबीएससी बोर्डाने मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लवकर वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएससी ने दावा केला आहे की, या वर्षी अंदाजे 44 लाख विद्यार्थी दहावी व बारावीची परीक्षा देतील. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 27 सप्टेंबर रोजी शाळांना सर्व परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवले असल्याचे खात्री करण्याचे आदेश दिले होते. सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थांच्या प्रमुखांना संबोधित करताना त्यात नमूद केले आहे की, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा केवळ सीसीटीव्ही सुविधा प्रदान केलेल्या खोलीत आयोजित केल्या जातील. शाळेत निश्चित कॅमेरे नसल्यास ते परीक्षेचे ठिकाण मानले जाणार नाही. असेही नमूद करण्यात आले आहे. 2025 च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हे धोरण लागू केले जाईल. सीबीएससी 2025 च्या परीक्षा मोठ्या प्रमाणावर सुरळीत आणि निपक्षपणे पार पाडण्यासाठी बोर्डाने एक सीसीटीव्ही धोरण विकसित केले आहे. ज्याद्वारे शैक्षणिक संस्थांना उच्च रिजोल्युशन कॅमेरे बसवण्यास सांगितले आहे. जेथे विद्यार्थ्यांच्या क्रिया आणि परीक्षा साहित्य सहज दिसतील.
