महत्त्वाच्या बातम्या

ऑनलाईन सातबारा कसा काढावा ?

    सातबारा उतारा हा जमीन खरेदी करण्यासाठी आवश्यक असतो. उत्पादक शेतकरी बांधवांना आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.आपण ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा काढू शकतो आणि हा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरू शकता.

   ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढण्यासाठी पुढील पायऱ्या-
 1. सातबारा काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असे सर्च करा.
2.त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी सातबारा या ऑप्शन वर क्लिक करा. तुम्ही जर आधी या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉगिन  आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. परंतु जर नवीन सातबारा काढायचा असेल तर तुम्ही मोबाईल क्रमांकाचा वापर करू शकता.
3.त्यासाठी OTP based login वर क्लिक करा. Enter Mobile No – च्या रकाण्यात तुमचा मोबाईल नंबर टाका आणि send OTP वर क्लिक करा.
4.त्यानंतर तुमच्या मोबाईलवर sms द्वारे OTP येईल. तो OTP  Enter OTP च्या खालील रकान्यात टाका व verify OTP वर क्लिक करा.
5.यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल त्यामध्ये digitally signed 7/12, digitally signed 8A, digitally signed property card, Recharge account,  payment history असे ऑप्शन्स दिसतील त्यामध्ये digitally signed 7/12 या ऑप्शनवर क्लिक करा.
6.त्यानंतर एक डिजिटल स्वाक्षरीत सातबारा असे पेज ओपन होईल त्यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिली आहे की, Rs. 15 will be charged for download every satarbara this amount will be deducted from available balance.
7.आपण नवीन रजिस्ट्रेशन केल्यामुळे आपल्या खात्यात काही बॅलन्स नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर bhim Upi , internet banking, Paytm  द्वारे तुम्ही पैसे जमा करू शकता.
8.त्यानंतर डिजिटल सातबाराचाा फॉर्म वर परत गेल्यावर तिथे पैसे जमा झाल्याचे दिसेल.
9.आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेले माहिती भरायची आहे. यात जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. नंतर सर्व्हे किंवा गट नं टाका. आणि सगळ्यात शेवटी डाउनलोड म्हणा.
10.तुमचा सातबारा डाउनलोड झालेला दिसेल.
टिप-  यावर स्पष्ट लिहलेले असते की,हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीत तयार केलेला असल्याने त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!