महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील आय टी कंपनीतील अधिकाऱ्याला 6.29 कोटींचा ऑनलाईन गंडा…आत्तापर्यंतची सर्वात मोठी फसवणूक.

      मुंबईतील एका आय टी कंपनी मधील उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी 6.29 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. ही पुणे सायबर पोलिसांनी नोंद केलेली आत्ता पर्यंतची सर्वात मोठी फसवणूक असल्याचे सांगितले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय अधिकाऱ्यांची तोतयागिरी  करत सायबर चोरट्यांनी 59 वर्षीय व्यक्तीस 9 ते 14 नोव्हेंबर पर्यंत पाच दिवस पाषाण येथील त्यांच्या घरी डिजिटल अटकेत  ठेवले होते.चोरट्यांनी मोबाईल फोन नंबर सह मनी लॉंड्रिंग व्यवहारांची पडताळणी आणि तपासणी या सबबी खाली पीडितेला डिजिटल अटकेत ठेवले होते.

     पोलीस उपायुक्त (सायबर) विवेक मसाळ याने सांगितले की, पुढील सहा महिन्यात सेवा निवृत्त  होणाऱ्या व्यक्तीने व्यथित होऊन  पोलिसांकडे तक्रार केली.पुणे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक स्वप्नील शिंदे यांनी स्पष्ट केले की, चोरट्यांनी संबंधित व्यक्तीशी मोबाईल मेसेंजर ॲप द्वारे संपर्क केला आणि त्याला मनी लॉंड्रिंग  प्रकरणात त्याचा संशयास्पद सहभागासाठी  डिजिटल अटक करण्यात आली असे सांगण्यात आले.  चोरट्याने आधार कार्डची छायाप्रत आणि पडताळणीसाठी त्यांच्या बँक खात्यातील पैशांचा तपशील पाठवण्याची सूचना दिली. त्यांनी व्यक्तीच्या तीन बँकांमधील 6.29 कोटी रुपयांचा तपशील गोळा केला व हा सर्व चौकशीचा भाग आहे असे सांगितले. नंतर  चोरट्याने आरबीआय नियमानुसार पैशांचे हस्तांतरण केले जात आहे असा दावा करून पैसे त्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यास सांगितले व चौकशीच्या अंती पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले.जर तो मनी लॉंड्रिंगच्या कृतीत गुंतलेला नसेल तर.

    पोलिसांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने ठगांच्या सूचनांचे पालन करत पाच व्यवहारांमध्ये हे पैसे त्याच्या खात्यावर जमा केले. त्यांनी अधिक पैसे हस्तांतरित करण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. हे प्रकरण मिटवण्यासाठी 60 लाख रुपये कर्ज मिळवाअन्यथा त्याला अटक करण्यास पोलीस पाठवले जातील असा दबाव करून भीती  घालण्यात आली. नंतर व्यक्तीला संशय आल्याने त्याने संवाद साधने थांबवले पोलिसांच्या साह्याने  चोरट्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. संबंधित व्यक्ती आणि सायबर चोर अशा दोघांमध्ये झालेल्या ऑडिओ व व्हिडिओ कॉल्स द्वारे  तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!