महत्त्वाच्या बातम्या

कबड्डी खेळताना शालेय विद्यार्थिनीचा डोक्याला लागून मृत्यू

     सातारा जिल्ह्यात काल एक दुर्दैवी घटना घडली. एका शाळेमधे इ १० मध्ये शिकत असलेल्या मुलीचा खेळताना पडुन मृत्यू झाला आहे.या बाबत शाहुपुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार कन्या शाळेत दहावी मध्ये शिकत असलेली अक्षदा देशमुख (वय वर्ष१५)राहणार यादव गोपाळ पेठ या मुली चा शाळेमध्ये कबड्डी खेळताना पडल्या मुळे डोक्याला मार लागल्याने सायंकाळी सव्वा पाच च्या दरम्यान बेशुध पडली होती. शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ मानसी पाटील यांनी तिला मयत घोषित केले.

     या अनुषंगाने  शाहुपुरी पोलीस स्टेशनमधे या घटनेची नोंद झाली सुन १६१/२०२४ B ns १९४ मृत्युची नोंद झाली आहे‌. सदर मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर डोक्यात जोराचा लागल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे  डॉक्टरांचे मत आहे. याबाबत अधिक तपास एपीआय बाबर मॅडम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!