महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्यातील पाटण मधून महिला बेपत्ता

   जंगलवाडी ता.पाटण जि.सातारा येथून महिला बेपत्ता झाल्याची वार्ता समोर आली आहे. रविवार दि. १ डिसेंबर २०२४ रोजी वेळ-सकाळी ०७.०० ते रात्री ०९.०० च्या  दरम्यान मौजे जंगलवाडी ता.पाटण जि. सातारा येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत.
 बेपत्ता व्यक्तिचे नाव व वर्णन- श्रीमती लीलाबाई दत्तू शितोळे वय-५० वर्षे (मानसिक रुग्ण) वर्णन-उंची ४ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, रंग सावळा, नाक  बसके, केस काळे पाढरे,  उजव्या हातावर मराठीत लीलाबाई असे गोंदलेले, अंगात नेसलेली हिरवी साडी,पायात काळया रंगाची फँन्सी चप्पल, मराठी भाषा बोलतात.
       दि.०६ डिसेंबर २०२४ रोजी ०६.१७ वा. याची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली.बेपत्ता महिला श्रीमती लीलाबाई दत्तू शितोळे (जंगलवाडी) ता.पाटण जि.सातारा येथील निवासी असून घरातून वेडाच्या भरात कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेल्या आहेत .त्यांचा सर्व नातेवाईक, पाहुणे यांनी आजूबाजूच्या परिसरात  शोध घेतला पंरतु त्या मिळाल्या नाहीत म्हणून त्याबाबत मल्हारपेठ पोलीस स्टेशन अंकीत चाफळ दुरक्षेत्र येथे मिंसिगची तक्रार देण्यात आली आहे. सदर महिलेचा  तपास पोलीस करत आहेत. सदर प्रकरणाची चौकशी चाफळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव वेताळ व काँन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे करत आहेत.
फोन नंबर-०२३७२२९९२३३ मो नंबर- ९८२२७९१३०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!