महत्त्वाच्या बातम्या

कराड मध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

      सातारा जिल्ह्यातील (ता.कराड) साळशिरंबे येथे दि.1 जानेवारी 2025 रोजी भव्य “आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे” आयोजन करण्यात आले आहे. संयोजक प्रमुख पंकज पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत  जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त या शर्यतीचे आयोजन केले आहे.या शर्यतीस आमदार अतुल भोसले,कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
       बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्यास 1 लाख रुपये व ढाल मिळणार असून पुढील विजेत्यांना 71 हजार 111 रुपये व ढाल, 51 हजार 111 रुपये व ढाल, 31 हजार 111 रुपये व ढाल, 15 हजार 111 रुपये व ढाल, आणि सातव्या क्रमांकास 11 हजार 111 व ढाल असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
     अखिल भारतीय बैलगाडी संघटने मार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे स्पर्धा पारदर्शक पार पडतील तसेच शर्यतीच्या ठिकाणी जत्रा कमिटी कडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दि 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत मैदानाची नोंदणी करण्यात आली असून स्पर्धेच्या एक दिवस आधी संघटनेच्या कार्यकर्त्याद्वारे गट पाडले जातील. संघटनेचे सर्व नियम पाळण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!