महत्त्वाच्या बातम्या

करुणा मंदिरचे जिवदया कार्य प्रेरणा दायी-डॉ. व्ही. एम साळुंके

     श्री करुणा मंदिरसेवा प्रतिष्ठान गोशाळेत गोवंश जनावरांच्या आरोग्याकडे योग्यपणे लक्ष दिले जाते. आजारी, बेवारस, सोडलेल्या , कत्तली पासून वाचवलेले गोवंश जणांवरांची सेवा येथे केली जाते. त्यांचे कार्य समाजाला  प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन डॉ. व्ही. एम साळुंके यांनी केले. 
       वेळे ता वाई येथील करुणा मंदिर गोशाळेत गुरांच्या खुरांच्या आरोग्य तपासणी शिबीर  क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. व्ही. एम साळुंके(उपसंचालक संशोधन )यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडले. यावेळी बैल, गायी यांचे वाढलेले खुर वैद्यकिय पद्धतीने कट करून त्याला आकार देण्यात आला. या वेळी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरिप्रसाद ऐथक व 16 पदव्युत्तर डॉ. विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
        अयोग्य व्यवस्थापन प्रणालीतून, तसेच अतिशय छोट्या बंदिस्त जागेत जनावरांना बांधून दुग्ध व्यवसाय करणे,व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर खुरांची छाटणी न करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे बंदिस्त गोठ्यात जास्त प्रमाणात जाणवते.मात्र जैन बांधवाणी जिवदयाच्या भावनेतून सुरु असलेल्या करुणा मंदिर गोशाळेत गोवंश जनावरंची खुप चांगली काळजी घेतली जाते तीन एकरात मुक्त संचार गोठा असल्याने गोवंश आरोग्य चांगले राहत आसल्याचे डॉ. व्ही. एम साळुंके यांनी सांगितले.करुणा मंदिरचे अध्यक्ष दिपचंद ओसवाल, उपाध्यक्ष ललित गुंदेचा,सचिव प्रफुल्ल मेहता संचालक राकेश ओसवाल व सर्व ट्रस्ट मंडळाच्या मार्गदर्शन खाली व्यवस्थापक गोसेवक विवेक भिडे यांचे सेवा कार्य कौतुकास्पदस्पद असल्याचे डॉ. व्ही. एम साळुंके यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!