महत्त्वाच्या बातम्या

पिंगळी जयभवानी विद्यालयात गुणगौरव कार्यक्रम संपन्न 

      पदवीधर शिक्षणा नंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन उच्चधिकारी बनता येते. मात्र बालवयातील शिक्षणाचे धडे घेऊन, चारित्र्य संपन्न, गुणवान, बुद्धिमान, भारतीय नागरिक बना असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्तव्यदक्ष दहिवडी पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथीवक्ते, जेष्ठपत्रकार दीपकराव तंडेबडवे हे होते.

     बक्षीसवितरण, व दहावी विद्यार्थीयांचे साठी शुभचिंतन कार्यक्रम पिंगळीच्या जयभवानी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उत्तम लेझिम नृत्य,व पारंपरिक पद्धतीने उपस्थितांचें स्वागत करण्यात आले. शाळा संस्थापक कै सदाशिवराव पोळतात्या, व त्यानां खंबीर साथ करणाऱ्या कै कमलाकाकी, व कै आबाजीराव पोळ स्मृतीस अभिवदंन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुख्यद्यापक बनसोडे यांनी प्रस्ताविकात शाळेने केलेली प्रगती कथन केली.तर डॉ.संदीप पोळ यांनी विद्यार्थीदशेत टीव्ही मोबाईल पासून दूर रहाण्याचा सल्ला दिला.आपल्या मार्गदर्शन अक्षय सोनवणे यांनी माझ्या आईने मला विद्यार्थी दशेत मोबाईल घेऊन दिला नाही. म्हणून मी कसा पोलीस अधिकारी झालो हे सांगितले.आपल्या वागण्यातून जन्मदात्या आई वडिलांची समाज्यात मान झुकणार नाही. याची प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीनीं काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वयात भरकटत जाऊन चुकीचे पाऊल पडले तर संपूर्ण जीवन कसे बरबाद होते हे उदारण दाखल सांगितले. सातत्याने अभ्यास करा. परीक्षा काळात बाहेरचे पदार्थ खाऊ नका. असा सल्ला देऊन विद्यार्थ्यांन सह शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. जेष्ठपत्रकार दीपकराव बडवे यांनी जीवनात शिस्त, प्रामाणिक पणा याला महत्व द्या.विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हाने कणखर मनाने पेलावीत.असे सांगून सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

      या कार्यक्रमास, माजी मुख्याध्यपक शेख, ऍड सजगणे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तुपे, शिक्षण समिती अध्यक्ष रवींद्र जगदाळे, गजानन गोसावी, पालक, व पिंगळी ग्रामस्थ उपस्थिती होते. सूत्रसंचालन महेश बडवेसर यांनी केले.तर आभार एस.आर. जगदाळेसर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!