महत्त्वाच्या बातम्या

कानपुर मधे 4 मजली इमारतीला  भीषण आग

कानपुर:  उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका बूट कारखान्यात भीषण आग लागली आहे.  इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक कुटुंब अडकले होते.   पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले गेले.कानपूरच्या चमनगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रेम नगरमध्ये  ही घटना घडली. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, आग प्रथम तळघरात सुरू झाली व अवघ्या 20  मिनिटात ती वरच्या मजल्यावर पोहोचली. रविवारी रात्री ही घटना घडली.चार मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चपलांचा कारखाना असल्याने या आगीने भयानक रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. 

सर्व जखमींचा रुग्णालयात मृत्यू 
       अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या इमारतीतून काही लोकांना वाचवले पण ते सर्वजण आगीत अडकल्यामुळे गंभीरपणे जळाले. एवढेच नाही तर बचाव कार्यानंतर सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले पण कोणालाही वाचवता आले नाही.  अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तथापि, इमारतीत आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, लोकांचे म्हणणे आहे की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!