महत्त्वाच्या बातम्या

किवळ अंतवडी योजनेचे यश; आमदार मनोज दादा घोरपडे यांचा मोलाचा वाटा

किवळ, अंतवडी, रिसवड, चिखली व हनबरवाडी या गावांना योजनेअंतर्गत नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू झाला असून, या योजनेसाठी आमदार मनोज दादा घोरपडे व लघु पाटबंधारे विभागाचे यादव साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. गावोगावी शेतकरी मिटिंग घेऊन नियोजन केले गेले आणि आमदार घोरपडे यांनी 24 तास वीजपुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

     या योजनामुळे या भागातील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. आमदार घोरपडे यांच्या प्रयत्नांबद्दल संपूर्ण गावकऱ्यांतून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.दरम्यान, स्व. भिकू नाना किवळकर यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान स्थानिकांना वाटत आहे. नानांच्या दूरदृष्टीमुळे या परिसराला पाणी मिळाले असून, त्यांच्या जयंतीनिमित्त (27 फेब्रुवारी) त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
याशिवाय, सह्याद्री साखर कारखान्याच्या स्थापनेतही भिकू नाना किवळकर यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. भविष्यात या कारखान्याच्या अध्यक्षपदी सभासदच असावेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!