महत्त्वाच्या बातम्या

आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांना मातंग समाज महा अधिवेशनासाठी निमंत्रण

कराड: महाराष्ट्रभर लहुजी शक्ती सेनेचे संघटन बळकट करण्यासाठी आणि समाजाच्या हक्कांसाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने 1 मार्च 2025 रोजी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात  मातंग समाजाचे महाअधिवेशन ‘दशभुजा गणपती मैदान सहकारनगर पुणे’ येथे  आयोजित करण्यात आले आहे. 

     या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे यांनीही या अधिवेशनाला उपस्थित रहावे, यासाठी  लहुजी शक्ती सेनेचे कराड उत्तर अध्यक्ष मंगेश गायकवाड तसेच कराड उत्तरचे युवक अध्यक्ष सुरज भाऊ केंजळे यांच्या शिष्टमंडळाने निमंत्रण दिले आहे. 

    आमदार मा मनोज दादा घोरपडे यांना अधिवेशनास उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच यांनी संघटनेला व मातंग समाजाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मातंग समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरज अरुण गायकवाड ऋषिकेश भैय्या गायकवाड सुशांत कांबळे ऋषिकेश मानसिंगराव गायकवाड चोरे चे आगम दादा इतर जेष्ठ तसेच तालुक्यातील युवक कार्यकर्ते  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!