कुडाळ प्रीमियर लीगच्या उद्घाटनास मंत्री ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती
साताऱ्यातील कुडाळ येथे क्रिकेट प्रीमियम लीगचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अशा लीग झाल्या पाहिजेत.या प्रकारच्या होणाऱ्या स्पर्धांमुळे भविष्यात नवोदित खेळाडू तयार होतील. त्यांना आज आपण योग्य प्रोत्साहन दिले तरच ते घडणार आहेत, असे प्रतिपादन नामदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत कुडाळ प्रीमियर लीग पर्व दुसरे याचे आयोजन कुडाळ ता. जावळी येथील पाटील मळा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेला प्रथम पारितोषिक 41 हजार 111 व ट्रॉफी तर द्वितीय पारितोषक 21 हजार 111 व ट्रॉफी ठेवण्यात आले होते. खेळाडूंचे मनोबल वाढावे याकरता प्रत्येक खेळाडूसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंत्री छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानावर चांगलीच फटकेबाजी करत आपल्या खेळाचे नैपुण्य खेळाडूंना दाखवले. तसेच खेळाडूंना स्पर्धा जिंकण्यासाठी आणि आपली कला सादर करत विविध बक्षिसे मिळवा असा कानमंत्रही यावेळी मंत्री महोदयांनी दिला.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पिंपळेश्वर वॉरियर्स कुडाळ तर द्वितीय पारितोषक रुद्र इलेव्हन कुडाळने पटकावले आहे.या स्पर्धेमध्ये अजिंक्य इलेवन, सुभेदार योद्धा, महाराजा फायटर्स, पिंपळेश्वर वॉरीयर्स, रुद्रा इलेवन, मावळा वॉरीयर्स या सहा संघाचा समावेश होता. या स्पर्धेचे आयोजन कुडाळ ११ क्रिकेट क्लब, क्लासमेट क्रिकेट क्लब यांच्यामार्फत करण्यात आले होते. या स्पर्धेला कुडाळ पंचक्रोशीतून मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला कुडाळ गावचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे भाऊराव (आण्णा) शेवते,कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव (अण्णा) शिंदे, राजेंद्र शिंदे,उपसरपंच सोमनाथ कदम, उद्योजक समीर आतार,ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे,डी.एम.के बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी,यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील रासकर, तलाठी सागर माळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश कीर्वे, गौरव शिंदे, धनंजय केंजळे, अमोल आंबुले,कुडाळ इलेवन, यात्रा कमिटी, कुडाळ पंच क्रोशीमधील सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
