केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025 साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 357 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 25 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
पदसंख्या आणि फोर्सनुसार तपशील
असिस्टंट कमांडंट (AC) – 357 पदे
BSF – 24, CRPF – 204, CISF – 92, ITBP – 04, SSB – 33
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
शारीरिक पात्रता
पुरुष: उंची – 165 से.मी., छाती – 81-86 से.मी., वजन – 50 कि.ग्रॅ.
महिला: उंची – 157 से.मी., वजन – 46 कि.ग्रॅ.
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):
20 ते 25 वर्षे
SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट
अर्ज शुल्क
General/OBC – ₹200/-
SC/ST/महिला – कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतभर नियुक्ती होईल.
महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2025 (संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत)
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा आणि अधिक माहिती मिळवावी.
