कोपरखैरणे येथे स्वर्गीय शरदजी (दादा) नाईक यांच्या जयंती निमित्त एस बी ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नवी मुंबई : वाशी कोपरखैरणे येथे स्वर्गीय शरदजी (दादा) नाईक यांच्या जयंती निमित्त एस बी ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आहे.या शिबिराचे आयोजन एस बी रिक्षा मालक चालक संघटना यांच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष. डॉ. देवेंद्र शरदजी (दादा) नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.
1. छत्रपती संभाजी राजे रिक्षा स्टॅन्ड कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई.
2. एस बी रिक्षा स्टॅन्ड घणसोली स्टेशन ठाणे बेलापूर रोड.
या ठिकाणी आयोजित केले आहे.
या शिबिरास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान करून समाजसेवेत आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
