महत्त्वाच्या बातम्या

गुजरात मधील पोरबंदर येथे  500 किलो हुन अधिक ड्रग्ज जप्त…आठ जणांना अटक

       गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी समुद्रात संयुक्त कारवाई केल्यानंतर शुक्रवारी गुजरात मधील  पोरबंदर समुद्रात 500 किलो हून अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. गुरुवारी रात्री  समुद्राच्या मध्यभागी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. एनसीबीने नौदल  आणि गुजरात एटीएस च्या सहकार्याने ही कारवाई केली. पोरबंदरच्या किनारपट्टीवर 500 किलो  मॅथेफेटामाईन जप्त केले तर आठ परदेशी लोकांना अटक केली आहे. ते इराणी  असल्याचा दावा केला जात आहे.

     ऑपरेशन सागर मंथन अंतर्गत नौदल आणि  तटरक्षक दलाच्या समन्वयाने अशा प्रकारच्या सागरी सरावांची मालिका हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 300 किलो विविध अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमले पदार्थांची तस्करी करणारे बोटींसाठी सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यात आले आहे .ही बोट आयएमबीएल च्या  रडारावर आल्यानंतर अमली पदार्थ हस्तगत  करण्यात आले.

    यापूर्वी मार्चमध्ये गुजरात एटीएस च्या पथकाने एका कारवाईत  सहा पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडील मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे व त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगितले होते. तसेच 13 ऑक्टोबर रोजी गुजरात आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईतील अंकलेश्वर येथील अवकार ट्रस्ट लिमिटेड कारखान्यातून 5000 कोटी किमतीचे 500 किलो पेक्षा जास्त  कोकेन जप्त करण्यातआले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!