गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी- डॉ.सुनील सूर्यवंशी
सातारा: पशुसवर्धन संशोधणाला चालना मिळावी यासाठी, गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी सातारा येथे केले.महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे सातारा येथे आयोजित जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, मार्गदर्शन करताना म्हणाले की, इतर जिल्ह्यातील संस्थांचे अनुकरणीय प्रयोग आत्मसात करून आपल्या जिल्ह्यात आदर्श कार्य उभे करावे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत नियमित पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यासाठी आवश्यक तजवीज व निधीची तरतूद केली जाईल. आगामी काळात गोशाळा व्यवस्थापनात मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. गो शाळेत काम करण्यासाठी मिळणारे कामगार मिळणे सर्वत्र अवघड होत चालले आहे. त्यासाठी कामगारांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
आयोगातर्फे पुढील काळात तालुकास्तरीय गोआधारित शेती प्रशिक्षण आयोजित करणार आहे. तसेच गोवंश हत्या बंदीचा कायदा अजून कसा कडक करता येईल. यासंदर्भात गो सेवा आयोग तज्ञ वकिलांची टीम तयार करून यावर काम करत असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. गोशाळांचे पर्यवेक्षण आयोगाकडून केले जाते. नियमात बसलेल्या गोशाळांना आयोगाकडून निधी दिला जाणार आहे. याप्रसंगी मा. श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, माननीय डॉक्टर विनोद पवार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉक्टर दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा,माननीय डॉक्टर नितीन मगर सहाय्यक आयुक्त,सातारा गोरक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विवेक भिडे,यांच्यासह सातारा जिल्ह्यातील गोशाळांचे ट्रस्टी, गो सेवक गोरक्षक,उपस्थित होते.
