महत्त्वाच्या बातम्या

घरगुती वादातून महिलेस पतीकडून मारहाण… खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासांमध्ये अटक

       साताऱ्यातील मेढा रोडवरील मौजे नरफदेव (मेरूलिंग) ता. जावली जि. सातारा येथे नवरा बायकोच्या वादातुन खून झाल्याची घटना घडली. सपना गौतम चव्हाण असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून (रा.ओझरे ता.जावली) ही तिच्या माहेरी असताना तिचा पती गौतम शिवाजी चव्हाण रा.ओझरे ता. जावली जि. सातारा याने जेवण बनविण्याच्या कारणावरून चिडून हाताने, लाथाबुक्यांनी तसेच लाकडी काठीने महिलेस मारहाण केली. त्यानंतर सदर महिले औषधोपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे अँडमिट केले असता सदर महिला उपचारा दरम्यान दि.१३ नोव्हेंबर रोजी मयत झाल्याचे सांगण्यात आले.  सदर मयत महिलेच्या भावाने  दिलेल्या  फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.१९०/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे. 

    सदर खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. बाळासाहेब भालचिम , वाई विभाग यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्यासाठी सुचना दिली आहे व मार्गदर्शना खाली श्री. पृथ्वीराज ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी हा भांडणे झाल्यापासून कोणत्या ठिकाणी गेलेला आहे याचा तपास सुरु केला. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे खास पथक तयार करून त्याचप्रमाणे गोपनिय बातमीदारांच्या सहाय्याने माहिती घेऊन शिताफीने आरोपीस केवळ 24 तासामध्ये अटक केलेली आहे. आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये रिमांड मध्ये घेण्यात आले असून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास चालु आहे.  सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती आश्विनी पाटील ह्या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!